आमच्या 'विहंग प्रकाशन' संस्थेची स्थापना माजी केंद्रीय मंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते १९९८ साली 'हिरोशिमा' या भा. द. खेर लिखित कादंबरीच्या निमित्तानं झाली. उत्तम आणि अभिजात साहित्य निर्माण करण्याचा आम्ही वसा घेतला आणि परिश्रमपूर्वक अनेक नवे विषय सुजाण वाचकांना दिले. अल्पकाळात 'विहंग प्रकाशन' संस्थेनं विषय, लेखन आणि निर्मिती या तिन्हींचा मेळ साधून आघाडीची मान्यवर प्रकाशन संस्था म्हणून नावलौकिक मिळवला. 'देह झाला चंदनाचा', 'गीतांबरी' 'धनंजय' 'वैदिक' अशा एकापेक्षा सरस 'बेस्ट सेलर' कादंबऱ्या आणि 'देवांच्या राज्यात' 'आर्य भारत' सारखी इतर अनेक पुस्तकं प्रकाशित करून साहित्यक्षेत्रात मानाचं स्थान मिळवलं. आमच्या पुस्तकांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानसन्मान लाभले आहेत. आम्ही चार भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित करतो. भारताबरोबरच amazon.कॉम तर्फे आमची पुस्तकं संपूर्ण जगात उपलब्ध होतात.
आम्ही अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, प्राचीन सांस्कृतिक विषय, रहस्य-चमत्कृतीपूर्ण कादंबऱ्या, परीकथा प्रकाशित करतो.
नकारात्मक विषय, शोकांतिका, निबंध, गौरवग्रंथ, कवितासंग्रह, लैंगिक विषय आम्ही प्रकाशित करीत नाही.
Vihang publications was founded in 1998 with the intension of publishing high value Marathi literary works. Mr. B. D. Kher’s ‘Hiroshima’ was the first novel published by Vihang publications at the hands of Hon. Mr. Sharad Pawar, the Agricultural Minister of India. Followed, a best-seller novel on the life of Revered Pandurang Shastri Athavale: ‘Deha Zala Chandanacha’ by Rajendra Kher was published that made revolution in Marathi world of publication. We received many national and international awards to our publications. Our books are translated in 3 languages viz. English, Hindi and Gujarati and received great response from readers and critiques.
We are thinking globally and willing to enter in English world of publication.
We are into the Publishing of:
Novels or Books dealing with Lives and Times of prehistoric India, Distinguished works and subjects, Optimistic Novels, Fantasies, Subjects of International acclaim, Fairy Tales, Subjects assessing the workings of world, Subjects of elite taste, Religious novels, Philosophical Novels, Religion and Culture imbibing Novels, Subjects handling Noble Religious and Cultural Values of Ancient India, Biographies and Biographical accounts of Laudable personalities across the globe.
We are not into Publishing of:
Books with Pessimistic subjects, Tragedies , Rebellious writings, Memorial writings, Contemporary Writings, Conventional or Conservative Subjects, Articles encircling Violent or Bold subjects, Articles written in the interest of Foreign Entities, Narratives not adhering to native language of the books, poetry, Subjects centered around sexual affairs, Writings exercising excessive use of freedom of expression to the extent of being Extremist of Fanatic etc.
****
आम्ही प्रामुख्यानं मराठी पुस्तकंच प्रकाशित करतो. अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, प्राचीन सांस्कृतिक विषय, रहस्यमय-चमत्कृतीपूर्ण (suspense-fantasy) कादंबऱ्या, परीकथा इत्यादी आम्ही प्रकाशित करतो. पण नकारात्मक विषय, शोकांतिका, निबंध, गौरवग्रंथ, प्रवास वर्णनं, पीएच.डी. प्रबंध, लैंगिक विषय आम्ही प्रकाशित करीत नाही. विशेषतः आम्ही प्राचीन संस्कृतीवर आधारित कादंबऱ्या प्रकाशित करतो.
आमच्या वरील ध्येय-धोरणांमध्ये आपलं पुस्तक बसत असेल तर पुस्तकाची कल्पना, विषय आम्हाला इ-मेलने पाठवावा. त्यानुसार आम्ही sample chaptersची मागणी करू. अनेक शुभेच्छा!
आमचा इ-मेल: vihangpublications@gmail.com